आऊट ऑफ द बॉक्स – क्रिकेट : भावलेलं, दिसलेलं आणि त्यापलीकडचं

आय पी एल (Indian Premium League-2018) सुरु होवून दोन-तीन  आठवडे झाले अन आपण टी २० क्रिकेट विश्वात रमून गेलो. प्रत्येकजण आपल्या आवडत्या खेळाडूच्या संघाच्या बाजूने बोलताना दिसतो. मी मुंबई इंडियन (Mumbai Indian) संघाला सपोर्ट करतो कारण  एकच सचिन तेंडूलकर, माझे काही मित्र आहेत त्यांना धोनी आवडतो त्यामुळे ते चेन्नई सुपरकिंगला ( CSK-Chennai Super King) सपोर्ट करतात.

जरी आपले आवडते खेळाडू वेगळे असले तरी आपल्याला किंबहुना आपली देशातील सर्वांना क्रिकेट या धाग्याने एकत्र बांधून ठेवेले आहे. सचिन ने ठोकलेली शतके असोत किंवा द्रविड ने टेस्ट क्रिकेट मध्ये केलेली तासंतास फलंदाजी असो आपण सर्व क्रिकेटप्रेमी हे सर्व मनापासून एन्जोय करतो.

आपल्याला सचिन, द्रविड, धोनी असो वा विराट  यांची सर्व माहिती असते, तसेच प्रसार माध्यमातून ती  आपल्याला  मिळत असते. पण गेली २५ वर्षे या सर्व खेळाडूंबरोबर अशी एक व्यक्ती आहे तिने आपल्या सर्वांना क्रिकेटचा आनंद लुटण्यात मदत केली आहे. तो क्रिकेटचा आवाज बनून आपल्या सोबत वावरत आहे . तो म्हणजे क्रिकेटचा  आवाज (Voice Of Cricket) हर्षा भोगले.

       माझ्यासाठी हर्षाच्या सामालोचनाशिवाय (Harsha Bhogle Commentary)  क्रिकेट अपूर्ण आहे. महाविद्यालीयन क्रिकेट सोडले तर कोणतीही क्रिकेटची पार्श्वभूमी नसताना हा अतिशय नम्र व्यक्ती गेली २५ वर्षे क्रिकेट विश्वातल्या सर्व मात्तबर मंडळीबरोबर वावरत आहे. क्रिकेट समालोचन बरोबर हर्षाची लेखणी हि तेवढीच सुंदर व सक्षम आहे. त्याचे वर्तमानपात्रातले क्रिकेटवरील लेख वाचातान आपण प्रत्यक्ष सामना पाहत असल्याची जाणीव होते.

जेंव्हा मी हर्षाचे आऊट ऑफ द बॉक्सक्रिकेट : भावलेलं, दिसलेलं आणि त्यापलीकडच (Out Of Box)वाचले तेंव्हाही मला हाच अनुभव आला. त्याने टी-२०, एकदिवसीय तसेच कसोटी क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट बद्दलचे त्याचे विचार, किस्से व लेख उत्तमरीत्या मांडले आहेत. ते सर्व वाचाताना मी क्रिकेट विश्वात हरवून गेलो. तो  अनुभव मी आता तुमच्याशी शेअर करत आहे.

या पुस्तकाची  प्रस्तावना साचिन ने लिहिली आहे प्रत्यक्ष क्रिकेटच्या देवाने (God Of Cricket) त्याचे केलेले कौतुक वाचून आपल्या लक्षात येईल ते त्याची नम्रता, मेहनत व क्रिकेटवरील त्याचे असलेले प्रेम. तसेच हर्षाने त्याचा क्रिकेट समालोचना प्रवास थोडक्यात मांडला आहे.

या पुस्तकाचे टी-२० सामने , एकदिवसीय सामने, कसोटी सामने, असामान्य क्रिकेटपटू आणि क्रिकेटच्या भल्याविषयी असे पाच प्रमुख विभाग आहेत. चला तर आपण प्रत्येक क्रिकेट प्रकारातील किस्से व गोष्टी जाणून घेवूया ज्या हर्षाने समालोचन कक्षातून पाहिली आहे.

  • टी-२० सामने ( T20 Cricket)

सध्या आपण टी-२० क्रिकेटच्या प्रेमात पडलो  आहे, पण या प्रकारच्या क्रिकेटची सुरवात भारता कशी झाली याच इतिहास आपल्याला या विभागात वाचायला मिळेल. भारताने पाहिले टी-२० विश्वाचषकाचे विजेतेपद मिळवले व त्यानंतर आय सी एल (Indian Cricket League)  व आय पी एल (Indian Premium League) या दोन स्पर्धांची कशी सुरवात झाली याचे किस्से वे गोष्टी सुंदर मांडल्या आहेत.

पहिला आय पी एल चे आयोजन तसेच खेळाडूंचा लिलाव (IPL Auction) याबद्दलच्य गोष्टी तसेच पडद्यामागचे अनुभव हे सगळे एका क्रिकेटप्रेमिसाठी पर्वणीच आहे. पहिल्या आय पी एल मध्ये हर्षा मुंबई इंडियन संघाच्या सपोर्ट स्टाफ मध्ये होता. त्यावेळी त्याने सर्व संघांची बांधणी तसेच आर्थिक घडामोडी या गोष्टी जवळून अनुभवल्या आहेत, त्याचे वर्णन अगदी सहजरीत्या मांडल्या आहेत.

राजस्थान रॉयल ( Rajasthan Royal )संघाचे विजेतेपद मिळवण्यासाठी शेन वॉर्नने केलेली संघ बांधणी असो व रवींद्र  जडेजा बद्दल केले त्याने विधान असे अनेक किस्से तुम्हाला इथे वाचायला मिळतील. तसेच श्रीसंत आणि हरभजन या दोघांचा वाद असो वा आय पी एल मागचे अर्थकारण या सगळ्यांची माहिती तुम्हाला खास हर्षाच्या मोहक शैलीतून वाचायला मिळेल.

एखादा झेल सुटणे हा कित अक्षम्य गुन्हा आहे हे आय पी एल -२ मधल्या सामन्यातून लक्षात आणून देण्यासाठी दिलेली काही उदाहरणे सुरेख आहेत. Time Out ची संकल्पान कशी सुरु झाली त्यामागची करणे याची माहितीही छान पद्धतीने मंडळी आहे.

असे एकूण २१ लेख या विभागात आहेत. ते तुहाला नक्की आवडतील.

 

  • एकदिवसीय सामने ( One Day Cricket)

या विभागाची सुरवात एकदिवसीय सामन्यांच्या नियमावलीत जे बदल करण्यात आले त्याबद्दलच्या लेखाणे होते. जसे Power Play ची मर्यादा १५ षटकांवरून  २० षटके केल्याने त्याचा होणारा परिणाम व गोलंदाजांवर झालेला अन्याय हे सविस्तर मांडले आहे.

२००५ व २००६ साली दुखापती नंतर सचिनने केलेले पुनरागमन व त्याच्या खेळी या सहज डोळ्यासमोर उभा राहतील अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. तसेच २००६ साली ऑस्ट्रोलिया  संघाने ICC Champions Trophy जिंकल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ चालू असताना जल्लोष करताना शरद पवारांचा केलेला अपमान याचाहि उल्लेख येथे आहे.

२००७ साली भरताचा बांगलादेश कडून झालेला पराभव व १९८३ ते २००७ या २४ वर्षामाधील  विश्वाचषकाचा दुष्काळ तसेच त्यानंतर धोनी नावाच्या नव्या जादुगाराचे कर्णधार  (Captain Cool : M.S.Dhoni )म्हणून झालेले आगमन याबद्दल चे लेख सुद्धा सुरखा मांडले आहेत.

या विभागात तुम्हाला एकूण १३ लेख वाचायला मिळतील.

 

  • कसोटी सामने ( Test Cricket)

    कपिल देवने हॅडलीचा ४३३ बळींचा विक्रम मोडला होता. तोच विक्रम २००४ साली अनिल कुंबळेने मागे टाकला. तसेच सचिनने सुनील गावसकर यांचा कासोतो क्रिकेट मधील ३४ शतकांचा विक्रम मोडला. या दोन्ही आठवणींचे वर्णन प्रत्येक क्रिकेटप्रेमी साठी पर्वणीच आहे.

चेंडूशी छेड-छाड  करणे (Ball tempering) हा क्रिकेट मधील कळीचा मुद्दा आहे. २००६ साली पाकिस्तान आणि इंग्लंड मधील कसोटी सामन्यात पंच हार्पर यांनी  पाकिस्तान संघावर Ball tempering चा आरोप केल्यानंतर कर्णधार इंझमाम ने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. यावरचा लेख या विषयावर प्रकाश टाकतो.

२००७ साली राहुल द्रविड कर्णधारपदी असताना भारताने इंग्लंड मध्ये कसोटी मालिका जिंकली होती.त्या मालिकेतील द्रविडची फलंदाजी व कर्णधारपद या दोन्ही भूमिका कशा पार पडल्या किंवा २००७-०८ साली अनिल कुंबळे कर्णधार असताना ऑस्ट्रोलिया दौऱ्यावर झालेला स्लेजिंगचा वाद (Monkey Gate)  आणि ऑस्ट्रोलियन खेलाडूंचा माज यावरील हर्षाचे मत वाचण्याजोगे आहे.

भरतीय संघाचे कसोटी क्रिकेटचे विदेशी दौरे, यश अपयश यावरचेही लेख उत्तम आहेत. या विभागात एकूण १२ लेख आहेत.

 

  • असामान्य क्रिकेटपटू ( Legend Cricketer’s)

     सचिन, द्रविड, कुंबळे, गांगुली व व्ही व्ही एस लक्ष्मण हे भारतीय संघाचे पांडव आहेत. या सर्व खेळाडूंचे भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. या विभगात वरील प्रत्येक खेळाडूवर हर्षाचे लेख वाचाताना त्यांचे कष्ट व क्रिकेटवरील त्यांचे प्रेम याची आपल्याला जाणीव होते.

      वरील प्रत्येक खेळाडूने भारतीय क्रिकेटची (Indian Cricket Team) १५ ते २० वर्षे केलेली सेवा, खेळ दरम्यान झालेल्या दुखापतीवर मात करून पुन्हा मैदानात उतरणे, तेसेच क्रिकेटसाठी त्यांची असलेली बांधिलकी लक्षात येते.

भारतीय खेळाडू असोत वा इंझमाम, सनाथ जयसूर्या किंवा ब्रायन लारा यांच्या वरील लेख सुद्धा त्या खेळाडू बरोबर क्रिकेटप्रेमीला जोडतात. ज्या लोकांना क्रिकेट आवडते त्यांच्यासाठी हे तर उत्तम खाद्य आहे.

 

  • क्रिकेटच्या भल्यासाठी ( Future Of Indian Cricket) 

भारतात रणजितसिंह यांच्या नावने रणजी सामन्यांची मालिका खेळवली जाते. या सामन्यानामध्ये जो खेळाडू आपले गुण व कौशल्य सिद्द करतो त्याच्यासाठी भरतीय संघाचे दार उघडते. पण एकदा कोणताही खेळाडूचे भारती संघात स्थान पक्के झाले कि त्याचे स्थानिक क्रिकेट खेळण्याचे प्रमाण कमी होते.

याचा वाईट परिणाम स्थानिक क्रिकेट वर होत आहे. लोकांनी स्थानी क्रिकेट पाहण्याकडे पाठ फिरवली आहे.या विषया वरील लेख स्थानिक क्रिकेट व्यवस्थेची माहिती देतात.

BCCI चे राखीव खेळांडू बद्दलचे धोरण तसेच पैसा व क्रिकेट याचे समीकरण या गोष्टींवर अवलंबून असलेले भारतीय क्रिकेटचे भविष्य यावरचे हर्षा भोगले चे सामिक्षण वाचल्यावर त्याचे क्रिकेट बद्दलचे ज्ञान तसेच सखोल विचार आपल्याला समजतात.

इंग्लंड संघ भरत दौऱ्यावर असताना २६/११ ला झालेला दहशवादी हल्ला असो व श्रीलंका संघ २००९ साली पाकिस्तान मध्ये असताना त्यांच्या बस वर झालेला हल्ला, दहशतवाद व राजकारण या सर्वांचे आशिया क्रिकेट संघांवर झालेले परिणाम यावरचे लेख उत्तमरित्या मांडले आहेत.

 

थोडक्यात सांगायचे झाले तर क्रिकेट प्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे एक मेजवानीच आहे. हर्षाने गेली २०-२५ वर्षे Commentary Box मधून जे क्रिकेट व खेळाडू पाहिलेत, अनुभवलेत ते प्रत्येकशी शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण ज्या लोकांना क्रिकेट हा विषय कंटाळवाणा वाटतो त्या लोकांनी किंवा वाचकांनी या पुस्तकाची वाट पकडू नये.

  हा लेख आपल्याला कसा वाटला. ते जरूर कळवा. तुमच्या सूचनांचे, टीकेचे आणि मार्गदर्शनाचे स्वागत असेल!!!!

 

 

 

 

 

 

Out Of Box By Harsha Bhogale –The Voice of Cricket

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *