Top 2 Books by Rujuta Diwekar-In Marathi

वजन कमी करा तेही आपले आवडते पदार्थ खाऊन !!!!

मागील महिन्यात मी स्वत:साठी कपडे घेण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मी माझ्या नेहमीच्या साईजची जीन्स ट्राय करत  होतो. तेंव्हा माझ्या लक्षात आले कि माझे पोट खूपच वाढले आहे. मी थोडा गंभीर झालो व आरश्यात निरखून पाहिल्यावर मला माझा स्थूलपणा जाणवला. मी माझ्या आवडीचे कपडे घेतले पण वाढलेल्या पोटाचा व स्थुलपणाचा विचार मनात तसाच घोळत राहिला.

थोड्या दिवसांनी मी गुगल वर स्थूलपणा कमी करण्यचे उपाय ( How to lose your be belly fat)शोधू लागलो, त्यावेळी मला ऋजुता दिवेकरची (Rujuta Diwekar Books) माहिती मला इंटरनेट वर वाचायला मिळाली. तिच्या प्रोफाईल मध्ये करीना कपूर ,सैफ आली खान, अनुपम खेर तसेच अनिल अंबानी सारख्या लोकांचे तिच्याबद्दल चे अभिप्राय वाचले  .ऋजुता दिवेकर हि मराठी मुलगी भारतातील आघाडीची डाएटीशियन आणि फिटनेस ट्रेनर (Best Fitness Trainer-2005) आहे.

त्यानंतर मी तिची दोन पुस्तके विकत घेतली, डोन्ट लूज युवर माईंड लूज युवर वेट ( Don’t Lose Your Mind Lose Your Weight ) आणि व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री ( Don’t Lose Out Work Out ) या दोन पुस्तकातून मला खाणे आणि व्यायाम या विषयी बरीच माहिती मिळाली व ती मी स्वत: अवलंबली. जर तुम्हाला आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन सुद्धा आपण आपले वजन कसे नियंत्रित ठेऊ शकतो या बद्दल माहिती हवी असेल तर पुढे वाचत राहा.

प्रथम आपण डोन्ट लूज युवर माइ माईंड लूज युवर वेट या पुस्तकाबद्दल बोलू . या पुस्तकात करीना कपूरच्या प्रस्तावाने बरोबर लेखिकेचे मनोगत दिले आहे. तसेच हे पुस्तक कसे वाचावे व यातील माहिती कशी अमलात आणावी (Rujuta Diwekar Diet Plan) हे सांगतले आहे. यामध्ये प्रमुख ६ प्रकरण आहेत. या पुस्तकाचे फायदे मी तुमच्याशी शेअर करत आहे.

 • डाएट म्हणजे कमी खाणे, उपास करणे इत्यादी आपले गैरसमज दूर होतात. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते,त्यामुळे प्रत्येकाचा डाएट वेगळा असतो. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही स्वत: तुमचा डाएट ठरवू शकाल.

 

 • जेवण्यापूर्वी, जेवताना व जेवल्यानंतर काय करावे याचे ६ मुलभूत व सोपे नियम, ज्यांचे पालन केल्याने तुमच्या जेवतील पोषकद्रव्यांचा तुम्हाला फायदा होईल.

 

 • पिझ्झा, बेकारी प्रोडक्ट, तळलेले पदार्थ,आणि सर्वात महत्वाचे गुलाबजाममिठाई सारखे तुमचे आवडते गोड पदार्थ कधी व केवढ्या प्रमाणात खावे याचे योग्य मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाऊ शकता तेही तुमचे वजन नियंत्रित ठेऊन.

 

 • ज्यूस, दुध, ताक तसेच कोल्ड-ड्रिंक्स इत्यादी पेये कधी व किती प्रमाणात प्यावीत याची संपूर्ण माहिती तीही शास्त्रोक्त स्पष्टीकरनासह समजावली आहे, त्यामुळे तुम्ही स्वत: तुमचे पेय ठरवू शकता. चहा व कॉफी या पेय बद्दलची माहिती वाचून तुम्हीच ठरावा चहा प्यावा कि नको.

 

 • सर्वात महत्वाचे पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहे व दिवसभरात किती प्रमाणात प्यावे व त्याचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे.

 

 • फळभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, तृणधान्य इत्यादी पदार्थातून आपल्याला कोणते प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटस व जीवनसत्व मिळतात यासाठी एक वेगळे प्रकरण आपल्याला वाचायला मिळेल. त्यामुळे तुम्ही स्वत: तुमच्याडाएट मध्ये कोणते पदार्थ घ्यायचे हे ठरू शकता

 

 • आपल्या आहाराचे शाकाहारीमांसाहारी असे दोन प्रकार आहेत. तर कोणते मांसाहारी पदार्थ आपल्या शरीरासाठी योग्य आहेत, तसेच ते  कधी व किती प्रमाणात खावे याची माहिती मिळेल. मांसाहार करतात त्या लोकांसाठी हि पर्वणीच आहे कारण त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी त्यना अजून एक नवीन कारण मिळेल.

 

 • तुम्हाला सर्व पदार्थ, डाएट याची सर्व माहिती दिल्यानंतर पुढील प्रकरणात तुम्हाला योग्य आहाराची ४ तत्वं दिली आहेत, त्यांचा वापर करून तुम्ही सकाळी उठल्यापासून  झोपेपर्यंत  कसा  व किती प्रमाणात आहार घ्यायचा आहे हे ठरवू शकाल. थोडक्यात तुम्ही तुमचा डाएट बनवू शकता.

 

 • वरील सर्व माहिती मिळाल्यानंतर तुमचा डाएट बनवण्यासाठी काही लोकांचे उदाहरण (Case Studies) दिली आहेत. विविध प्रकारच्या जीवनशैली असलेल्या लोकांचे डाएट कसे असावेत याची तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही स्वत: तुमचा डाएट बनवू शकता.

 

 • सर्वात शेवटचे प्रकरण हे महत्वाचे आहे यात तुम्हाला मिळालेले ज्ञान व कृती यांचा मेळ कसा घालायाचा याचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. रुजुताने  तुमच्यासाठी खास ६ स्टेप्स दिल्या आहेत, तुम्ही त्यांचे अनुकरण केले तर तुमचे वाढलेले पोट तर कमी होईलच पण त्या बरोबर एक आरोग्यदाई जीवनशैली तुम्ही आत्मसात करू शकाल.

 

 • सर्वात शेवटी रुजुताने १० अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला मागे खचू शकतात. त्याच बरोबर १० अशा गोष्टी सांगितल्या आहेत कि ज्या तुम्हाला तंदुरुस्तीच्या मार्गावर घेऊन जातील. तसेच सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे व्यायाम तुमच्या आयुष्याचा अनिर्वाय भाग आहे, यात तडजोड नाही.

 

वरील सर्व माहिती हि पुस्तक असलेल्या माहितीच्या फक्त १० ते १५ % इतकी आहे. जेंव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल    त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या तंदुरुस्त आयुष्य जगण्याचे रहस्य तुम्हाला मिळाले असेल.

आता आपण दुस-या पुस्तकाकडे वळु , एकदा आपल्याला खाण्याची शिस्त लागली की पुढची पायरी म्हणजे व्यायाम. यासाठी मी रुजूताच्या ‘व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री या पुस्तका बद्दल तुम्हाल थोडी माहिती देणार आहे. पुस्तकाच्या सुरवातीला फ़िट्नेस साठी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगीतल्या आहेत.

 

 • योग्य आहार – यासाठी तुम्हाला डोन्ट लूज युवर माइ माईंड लूज युवर वेट हे पुस्तक वाचावे लागेल.
 • निवांत झोप – तुम्ही वेळी अवेळी झोपलत तर तुमच्या व्यायामाच टाईम टेबल बिघडलाच म्हणून समजा.
 • तणावरहीत नातेसंबंध- तुमच्या मनावर नात्याचा, कामाचा तणाव असेत तर त्याचा तुमच्या शरिरावर परिणाम होऊ शकतो.

या नंतर आपण पुस्तका बद्दल अधिक माहिती घेऊया, चला तर तुम्ही तयार आहात ना !!!!

 • सर्वप्रथम आपले जे काही व्यायमा बद्दलचे गैरसमज आहेत, जसे विशिष्ट जागेची चरबी कमी करणे, धावणे गुढ़्ग्यासाठी वईट असते, फ़क्त १०० सूर्यनमस्कार घाला, हे सर्व पहिले प्रकरण वाचल्यवर निघुन जातील.

          दर आठवड्याल फ़क्त १५० मिनिटे व्यायम पुरेसा आहे. तो कसा करायचा व त्याचे वेळपत्रक कसे बनवायचे ते आपण पुढ़े बघणार आहोत.

 • आपण सर्व जण व्यायम करतो पण त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे आपल्याला माहित नसते. कार्डिओ (Cardio Exercises), ॲरोबीक (arobics Exercises), जिम (Gym Workout) ईत्यादी व्यायम प्रकारांचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो व त्याचा आपल्या शरीराला कस फ़ायदा होतो याची शास्त्रशुद्ध महिती तुम्हाल मिळेल.

 

 • एकाच प्रकारचा व्यायम करून तुमच्या शरीराला सर्व फ़ायदे मिळणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारचा व्यायम करव लागेल. जो व्यायाम नियमीत केला जातो तो सर्वोत्तोम व्यायाम. आयुष्यभर बांधिलकि हवी असेल तर सर्वांगीन विचाराने व्यायाम नियोजन हवे, ते कसे करवे याची संपुर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळेल.

 

 • स्ट्रेन्थ ट्रेनिंग हा मधुमेहासकट समस्त जीवनशैलीशी निगडित अजारांवर एकमेव रान्बाण उपाय. तो कसा करायचा त्याचि पुर्व तयारी , नियोजण याची सर्वं माहीती (workout routine and workout plans) तुम्हाला या प्रकरणात मिळेल. जिम टाळण्याची आपली नेहमीची कारणे कोणती व ती कशी बाजुला करायची याचे सर्व मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. (म्हणजे व्यायाम सुरू न करण्याचे कॊणतेच कारण तुम्ही सांगू शकणार नाही.!!)

 

 • वर्क आऊट आधीचा व वर्क आऊट नंतर कोणता आहार घ्यायचा हे वर्क आऊट येवेढेच महत्वाचे आहे. तर वर्क आऊट बरोबर सप्लीमेंट घ्यावेत कि नको याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे वर्क आऊट चा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल.

 

 • कार्डीओ हे प्रकरण  खूप महत्वाचे आहे. सध्या आधुनिक युगात या व्यायाम प्रकारात खूप वाढ झाली आहे. आपण मासिके, वर्तमान पत्र व जाहिरातीत पाहून हा व्यायाम प्रकार करत असतो. पण या व्यायाम प्रकारची काही शास्त्रशुद्ध पद्धत आहे तसेच या व्यायाम प्रकारच आहार वेगळा आहे.

          कार्डीओ व्यायाम प्रकार कसा करावा व त्याचे नियोजन कसे करावे त्याबद्दलचे समाज गैरसमज याचे संपूर्ण मार्गदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहे.

 

 • स्ट्रेन्थ ट्रेनिंग व कार्डीओ या दोन्ही व्यायाम प्रकाराबद्दलचे जे काही तुमचे प्रश्न आहेत ते दूर करण्यासाठी त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी एक छोटेसे प्रकरण आहे त्यात तुम्हाला सर्व उत्तरे मिळतील, तसेच रुजुतला तुम्हाला काही विचारायचे असल्या ई-मेल किंवा फेसबुक पेज वर तुम्ही तुमचे प्रश्न, शंका विचारू शकता. ( मला माझ्या प्रश्नाचे उत्तर फेसबुक पेज वरून मिळाले होते तेही १ दिवसात.)

 

 • योगाभ्यास ( How to do Yoga) हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा भाग आहे. या पुस्तकात तुम्हाला योगविद्येचा इतिहास वाचायला मिळेल. तसेच भारतातील प्रमुख योग गुरु व त्यांनी सुरु केलेल्या विविध संस्थेची माहिती इथे वाचायला मिळेल.

तसेच तुमच्यासाठी योग्य  योगवर्ग कसा निवडावा (Types of Yoga) व त्याची शहानिशा कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे.

 • योग आसनांचा ( yoga poses and yoga asanas)क्रम तसेच योगासने करणाऱ्या व्यक्तीने कोणता आहार करायचा याचीही माहिती या प्रकरणात मिळेल.योगविद्येविषयी असलेले गैरसमज व सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील.

 

 • तिन्ही प्रकारच्या व्यायामाची माहिती मिळाल्यानंतर स्वत: साठी व्यायामाचे नियोजन कसे करावे तसेच आपल्या नियोजनात तिन्ही व्यायाम प्रकार किती प्रमाणात करावे याचे उदाहरणासह (Case Studies)सांगितल्या आहेत. त्यामुळे आपल्या मनात कसलेही प्रश्न किंवा शंका राहत नाही.

           जरी तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही ई-मेल किंवा फेसबुक पेज वर विचारू शकता.

       

योग्य आहार कसा निवडावा व कोणता व्यायाम प्रकार करावा तुमचे हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वरील पुस्तकातून नक्की मिळतील. हा लेख तुम्हाला कसा वाटला याच आभिप्राव नक्की कळवा. तसेच तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरील पुस्तकांची माहिती हवी असेल तर नक्की कळवा.

तुमच्या सूचनांचे, टीकेचे आणि मार्गदर्शनाचे स्वागत असेल!!!!

Rujuta Diwekar books- In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *